breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार? ‘न्याय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवला. मात्र त्यानंतर ही नक्की हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता, याप्रकरणी अद्यापही सीबीआयची चौकशी सुरू आहे, मात्र आता सुशांतच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणारा चित्रपट भेटीस येणार आहे. चित्रपटचं नाव ‘न्याय : द जस्टिस’ असं असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

सुशांतचं फिल्मी करियर, त्याचं रिलेशनशिप, सुशांतला झालेला मानसिक त्रास इत्यादी गोष्टी दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या माध्यमातून प्रखरपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान,सुशांत सिंह राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button