breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यात भाजपला धक्का, खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ मानले जाणारे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पवारांकडून आपल्याला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निमंत्रण आल्याची माहिती काकडेंनी दिली आहे. त्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये संजय काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उदयनराजें भोसले यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधान करत भाजपला टार्गेट केलं होतं.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. उदयनराजेंनी भाजपसाठी काय योगदान दिले, असा सवाल संजय काकडेंनी उपस्थित केला होता. दरम्यान, गेल्यावर्षी संजय काकडे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडेंची समजूत काढली होती. आता पुन्हा एकदा काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button