breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रकाश आंबेडकर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार का? आमंत्रण मिळाल्यानंतर म्हणाले, भाजपा आणि आरएसएसने..

मुंबई | २२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याचं अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. हे आमंत्रण स्वीकारल्याचं पत्र प्रकाश आंबेकरांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांना अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. यानंतर त्यांनी ट्रस्टला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात म्हणाले, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या कथित सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. कारण भाजपा आणि आरएसएसने या सोहळा हाती घेतला आहे. एका धार्मिक सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर राजकीय पक्ष धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवतील तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येऊ शकते. कदाचित हे स्वातंत्र्य आपण कायमचे गमावून बसू असं सांगितले होते.

हेही वाचा     –      OTT | ‘या’ आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार अनेक चित्रपट आणि वेबसिरीज, पाहा यादी

आज बाबासाहेबांनी जी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरत आहे. धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. पत्राच्या शेवटी आंबेडकरांनी जय फूले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम असा उल्लेख केला आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button