breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

आज बाजारात सोने झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

कालच सोन्याचे दर अचानक 10 हजारांनी वाढल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र आता आज बुधवारी सकाळी वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं पहायला मिळालं. एमसीएक्समध्ये ५ ऑगस्ट २०२०साठी सोन्याचा वायदा भाव सकाळी ८७ रुपयांच्या घसरणीसह ४९,१८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. MCXवर ४९,२२८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर सोन्याचा भाव खुला झाला तर चांदीचा भाव १८७ रुपयांच्या वाढीसह ५२८३६ रुपये प्रति किलोग्रॅमवर सुरू होता.


सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्यावर त्यात गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तज्ञांच्या मते, सध्याच्या काळात सोने-चांदीची मागणी खूपच वाढलेली आहे आणि वायदा बाजारातही मागणी आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव एमसीएक्सवर ५२,००० रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.


मुंबईमध्ये सोने आणि चांदीच्या भावात अगदी किरकोल वाढ दिसून आली. बुधवारी सकाळी सोन्याच्या भावात १० रुपये प्रति ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९३० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९३० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. यासोबतच चांदीच्या भावातही १० रुपये प्रति किलोग्रॅम इतकी वाढ झाल्यामुळे चांदीचा दर ५२१३० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button