breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर

मुंबई | मनसेच्या महाअधिवेशनाच्या तोंडावर राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव ‘कृष्णकुंज’वर गेले आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दोन्ही नेते पोहचले असून हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हर्षवर्धन पाटील मनसेमध्ये पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button