Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

बायकोची डोक्याच कुऱ्हाड घालून हत्या

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात नवऱ्याने बायकोच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गिता रामलाल पावरा असं मृत महिलेचे नाव असून, पती रामलाल पावरा हा पत्नी गिताबाई पावरा याच्याकडून रात्री दात घासण्यासाठी तपकीर मागत होता गिताबाईने तपकीर देण्यास नकार दिल्याने रागाचा भरात येऊन रामलाल पावरा यांनी गीताबाईच्या डोक्यात कुऱ्हाड टाकून गंभीर रित्या जखमी केले.

सदर घटनेचे वृत्त परिसरातील नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी शिरपूर येथील उपरुग्णालयात गीताबाई पावरा हिला दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. सदर महिलेची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील नटवाळे येथे घडली आहे. रामलाल हजाऱ्या पावरा (वय ५०) असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेचे वृत्त कळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ नटवाडे येथे जाऊन घटनेची संपूर्ण माहिती घेतली मयत गीताबाईच्या पतीला शिरपूर पोलिसांनी अटक केली. रामलाल पावरा यांच्याविरुद्ध भा.द.वी.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button