breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक, आज देशव्यापी बंद पुकारला

नवी दिल्ली – नव्या कृषी विधेयकावरुन आज (२५ सप्टेंबर) शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.\

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button