breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी- इंद्रायणीनगरमध्ये घरघरांत शिवजयंती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी
मनामनांत शिवराय…घराघरांत शिवजयंती… या उपक्रमाला भोसरी-इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आपल्या घराघरात थाटामाटात साजरा करण्याची परंपरा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी जोपासली आहे.
‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ ही संकल्पना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील घराघरांत रूजते आहे. याच धर्तीवर आपणही राजांची जयंती दणक्यात साजरी करावी या हेतूने लांडगे यांनी जनजागृती केली. आपल्या घरीच शिवजयंती सोहळा आयोजित करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते.
गडसंवर्धनाचा संदेश…
शिवराय मनामनात… शिवजयंती घराघरांत… या उपक्रमाच्या माध्यमातून गडसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. ही संकल्पना हळूहळू भोसरी- इंद्रायणीनगर परिसरात प्रत्येक घरात, सोसायटींमधील नागरिकांमध्ये रुजत आहे. घरात, सोसायत्यांमध्ये उत्साहाने शिवजयंती साजरी व्हावी यासाठी हा एक छोटा प्रयत्न केला होता, अशी प्रतिक्रिया शिवराज लांडगे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button