breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

भारतात मोबाइल नंबर हा दहा आकडीच का वापरला जातो?

10 Digit Mobile Number : मोबाईलमधील सिम कार्डचा नंबर हा १० अंकी का असतो?. हा युनिक नंबर ५, ६, ७ किंवा ८ अंकी का नसतो? तुम्हाला हा प्रश्न कधी पडलेला नसेल तर आता नक्कीच पडला असेल आणि तुम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागलेली असेल. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही वापरत असलेल्या टेलिकॉम नंबरच्या सिम चा नंबर हा १० अंकिच का असतो. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती आमच्या या लेखाच्या माध्यमातून.

आपल्या देशातील मोबाईल नंबर हा १० अंकिच का असतो याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोणत्या देशाचा मोबाईल नंबर किती अंकी ठेवायचा हे ज्या त्या देशाच्या लोकसंख्येवरुन ठरवले जाते. लोकसंख्येच्या प्रमाणावरूनच मोबाईल नंबर हा किती अंकी ठेवायचा हा निर्णय घेतला जातो. आणि त्यानुसारच मोबाईल नंबर किती अंकी असावा याबाबतची मार्गदर्शक तत्वे ठरवली जातात. मागे झालेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही १३४ कोटी ६० लाख ४७ हजार ६४५ एवढी आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या देशभरात दर सेकंदाला लोकसंख्येचा आलेख हा वाढताच असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच तुम्हाला दर सेकंदाला भारताची लोकसंख्या किती प्रमाणात वाढते आणि आताची आपली लोकसंख्या किती आहे हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही LivePopulation.com या संकेतस्थळावरला भेट देऊन ते तपासू शकता.

हेही वाचा – ‘धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम आरक्षणाला भाजपा खासदारांचा विरोध’; सुप्रिया सुळेंचा आरोप 

आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की लोकसंख्येचा आणि मोबाईल नंबरचा काय संबंध? तर लोकसंख्येचा थेट संबंध हा मोबाईल नंबरशी आहे. पहिले तो कसा ते पाहुयात, आपल्या देशभरात मोबाईल सेवा आणि त्याच्याशी संबंधित एक मंत्रालय आणि बोर्ड आहे. याच काम आहे की मोबाईल किंवा नेटवर्कशी संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवणे आणि त्यात कोणतीही अडचण येऊ नये हे. तर या मंत्रालयाने असा विचार केला की देशात जन्माला येणार प्रत्येक व्यक्ती हा मोबाईलचा वापर करणारच. कारण मोबाईल हा सध्या प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि तो मोबाईल वापरणारा व्यक्ती मोबाईल वापरणार म्हणजे त्या मोबाईलच्या नेटवर्कसाठी त्याला कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा मोबाईल नंबर घेणे गरजेचं आहे.

म्हणूनच लोकसंख्येचा विचार करूनच आपल्या सरकारने National Numbering Plan १० अंकी टेलिकॉम नंबरचा स्वीकार केला आहे. सरकारने स्वीकार केलेल्या १० अंकी नंबरमधून आपण १ हजार कोटी वेगवेगळे नंबर तयार करू शकतो. या दहा अंकांत आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असलेले नंबर्स तयार करू शकतो. यातून एकच बाब लक्षात येते की आपल्या सरकारने हा विचार करूनच दहा अंकी नंबर स्वीकारला आहे की, उद्या आपली लोकसंख्या १ हजार कोटींच्या घरात जरी गेली तरी प्रत्येकाला आपला युनिक मोबाईल नंबर मिळू शकेल. आता भारताची लोकसंख्या १३४ कोटीच्या आसपास आहे. पुढे जाऊन ही आकडेवारी १ हजार कोटींच्या घरात जरी गेली तरी कोणालाही मोबाईल नंबरची कमी पडणार नाहीये. आपली लोकसंख्या जरी १ हजार कोटी एवढी झाली तरी प्रत्येकाला वेगवेगळा मोबाईल नंबर मिळू शकणार आहे. हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन आपल्या सरकारने १० अंकी मोबाईल नंबरचा स्वीकार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button