breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा गल्ला

Jhimma 2 : ‘झिम्मा २’ हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. आता हा सिनेमा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे.

हेमंत ढोमे, दिग्दर्शक सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा 2’ हा सिनेमा २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा  –  ‘२०१९ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते’; अजित पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

‘झिम्मा’ हा सिनेमा कोरोनानंतर प्रदर्शित झाला. या सिनेमाने हिंदी सिनेमांनाही मागे टाकलं. प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत होते. दोन वर्षांनंतर ‘झिम्मा २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘झिम्मा २’ हा सिनेमा पाहायला प्रेक्षक सहकुटुंब जात आहेत. तर अनेक महिलांचे ग्रुपदेखील मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा आवडत आहे. स्वतः शोधायला भाग पाडणारा असा हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना भावत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button