breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणी अजून एक मृतदेह सापडला

ठाणे – स्फोटक प्रकरणात वापरलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता त्याचठिकाणी आणखी एक मृतदेह सापडला आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं.

बचावकार्य पूर्ण करण्यात आलेलं असून मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचं आपत्ती विभाग आणि पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button