breaking-newsराष्ट्रिय

समान नागरी कायद्याला उत्तर प्रदेश शिया बोर्ड प्रमुखांचे समर्थन

लखनौ (उत्तर प्रदेश) – समान नागरी कायद्याला उत्तर प्रदेश शिया बोर्ड प्रमुखांनी समर्थन जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष वासीम रिझवी यांनी विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तकविधान अशा प्रकरणांकरिता सर्व समाजांसाठी समान नागरी कायदाचे समर्थन केले आहे. जर गोवा राज्यात हे होऊ शकते, तर इतर राज्यांमध्ये ते का होऊ नये? असा प्रश्‍न त्यांनी एनएलसी (नॅशनल लॉ कमिशन) ला पाठवलेल्या एका प्रस्तावात उपस्थित केला आहे. एआयएमपीएलबी (ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) चा समान नागरी कायद्याला विरोध असूनही वासीम रिझवी यांनी त्याचे समर्थन केले आहे.

वेगवेगळ्या समाजाच्या रीतिरिवाजांमध्ये विविधता असू शकेल, परंतु विवाह, घटस्फोट, वारसा, पारंपारिक मालमत्तेमध्ये मुलांना व मुलींना समान वाटा देणे, वारसाहक्क आदी गोष्टींसाठी एक राष्ट्र एक कायदा हेच तत्त्व असले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या एआयएमपीएलबीबरोबर त्यांचा या मुद्यांवरून वाद चालू आहे. एआयएमपीएलबीने समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी इंडियन शिया मुस्लिम लीग नावाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button