breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘जीआयएस प्रणाली नुसार चालणार महानगरपालिका विविध विभागांचे कामकाज’; आयुक्त शेखर सिंह

मनपाच्या २० विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी जीआयएस कार्यप्रणाली सुरू

पिंपरी : भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत जीआयएस प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २० विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी जीआयएस कार्यप्रणाली सूरू करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार यापुढे महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज चालणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

मनपाच्या संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना एका क्लिकवर आपल्या कार्यक्षेत्रानुसार मनपाच्या सुविधांची (उदा. रस्ते, पाण्याची टाकी, पोल्स, फुटपाथ, उद्याने, प्रभागानुसार क्षेत्र, क्रीडांगणे, मनपा मालमत्ता आदी) ठिकाणे अशा ३०० पेक्षा जास्त स्तर पाहता येणार आहे. त्यानुसार, आवश्यक माहिती संपादित करून अहवाल तयार करण्यात मदत होणार आहे, असे आयुक्त सिंह म्हणाले.

स्थायी समिती सभागृहात आयुक्त सिंह यांच्या हस्ते मनपाच्या २० विभागांसाठी तयार केलेल्या “पीसीएमसी जिओपोर्टल्स” चे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सह आयुक्त चंद्रकांत इंटलकर, उपायुक्त विठठल जोशी, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, विजय बोरुडे यांच्यासह एटॉस इंडियाचे प्रकल्प संचालक अविनाश पाटील, नॅसेंट प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत परसाई, केपीएमजी प्रकल्प व्यवस्थापक कल्पेश बोंडे, ‍सिताराम फुले तसेच मनपा अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी, व्हिडिओ चित्रफीतीद्वारे सदर प्रकल्पाचे सादरीकरण करून उपस्थितांना माहिती देण्यात आली.

हे विभाग करणार ‘पीसीएमसी जिओपोर्टल्स’चा वापर..

स्थापत्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, विद्युत विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, अग्निशामक विभाग, उद्यान विभाग, आरोग्य विभाग, भूमी आणि जिंदगी, वैद्यकीय विभाग, कर संकलन, समाज विकास विभाग, जलनि:स्सारण, आकाश चिन्ह परवाना, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा विभाग, अणुविद्युत व दूरसंचार, नगररचना, पशुवैद्यकीय, पाणी पुरवठा या विभागांसाठी प्रथमत: ‘पीसीएमसी जिओपोर्टल्स’ सूरू करण्यात आले आहे.

मनपाच्या जिओ पोर्टलच्या विभागानुसार सुविधा :

नगररचना विभाग : जीआयएस आधारित डीपी योजना आणि सर्व आरक्षण क्षेत्रे, विभागांतर्गंत सेवा, डीपी नकाशा, योजना, डीपी टिप्पणी इ.

स्थापत्य विभाग : कार्यान्वीत रस्ता, डीपी रस्ता, नॉन-डीपी रस्ता, पूल, बोगदे, पदपथ, ग्रेड सेपरेटर, लहान पुल, रेलिंग, बीआरटीएस रस्ते, बस थांबे इ.

पाणी पुरवठा विभाग : अस्तित्वात असलेले पाणी पुरवठयाचे जाळे, पाणी जोडण्या, व्हाल्व्ह, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र (WTP) इ.

मलनिस्सा:रण व ड्रेनेज : मलनिस्सारण आणि ड्रेनेजचे जाळे, स्टॉर्म वॉटर जाळे, स्टॉर्म वॉटर नेटवर्क, मॅनहोल, मलनिस्सा:रण प्रक्रीया प्रकल्प, तसेच अंतर्गत कार्यपध्दतीचे कामकाज इ.

विद्युत विभाग : (उदा. इलेक्ट्रिक पोल, फीडर पिलर, स्ट्रीट लाईट आदी विषयक माहिती)

क्रीडा विभाग : ( उदा. मनपाच्या क्रीडा सुविधा, मैदान, जिम, टेनिस कोर्ट, बॅडमिंटन हॉल, स्विमिंग पूल तसेच कार्यालयीन कामकाज इ.)

वैद्यकीय विभाग : (उदा. रुग्णालयांची ठिकाणे तसेच विभागांतर्गत कामकाज)

अग्निशमन विभाग : (उदा., अग्निशमन दलाच्या स्थानकांची ठिकाणे आणि इमारती)

उद्यान विभाग : (उदा. बागांचे क्षेत्र आणि स्थान, उद्याने, प्राणी संग्रहालय पर्यटन आणि प्रमुख ठिकाणे) (उदा. मनपा गार्डन आणि स्मारके)

हेही वाचा – जयंत पाटील अजित पवारांच्या संपर्कात? अमोल मिटकरी म्हणाले..

जिओ पोर्टलद्वारे मिळणार सेवा :

विभागानुसार नेमणूक करण्यात आलेले वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना लॉगीन आयडीद्वारे मनपा मालमत्ता पाहता येणार आहे. त्यामध्ये, जिओपोर्टल, जीआयएस लेयर ऍक्सेस, संपादन केलेली विभागांची माहिती, उपलब्ध सेवा आणि त्यांची संख्या इत्यादी माहिती घेता येईल. तसेच, आवश्यक तपशीलांवर आधारित माहिती काढणे, त्याचे विश्लेषण करून अहवालाची पूर्तता करणे सोपे होणार आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण शहर हे ३६०० डिग्रीमध्ये बघता येणार असून मनपाच्या विविध मालमत्ता जसे की इलेक्ट्रीक पोल्स, फुटपाथ- रस्त्यांची लांबी- रुंदी, अनधिकृत होर्डींग इ. यांचे मोजमाप कार्यालयातून करता येणार आहे.

डिपार्टमेंटल जिओपोर्टलनुसार संबंधित विभागातील कर्मचा-यांना आपल्या विभागासंबंधी जीआयएस ची माहिती बघता येणार असून, मनपाच्या मालमत्तांची माहिती अपडेट करता येणार आहे. तसेच, जीआयएस माहितीनुसार नियोजित विकासाचे विश्लेषण करता येणार आहे. तसेच, बफर ऍनेलिसिस करणे सोपे होणार आहे.

डिपार्टमेंटल जिओ पोर्टल वापरकर्त्याला ठराविक अंतरानुसार संपूर्ण शहराचे एलिवेशन प्रोफाइल तयार करता येईल. ज्याचा बांधकाम, रस्ते, पाणी पुरवठयाचे जाळे इत्यादींच्या नियोजनासाठी मनपाच्या विभागांना मदत होईल.

मनपा कार्यक्षेत्रातील बाधित क्षेत्र, उच्च मालमत्ता कर चुकवणारे क्षेत्र इ. ओळखण्यासाठी ठिकाणानुसार आधारित हीटमॅप तयार करता येईल. सॅटेलाइट व्ह्यू, मल्टी कलर मॅप आणि ग्रे मॅप सारखे नकाशा, रात्रीचे दृश्य पाहता येणार आहे. जिओपोर्टल द्विभाषिक असून मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचा वापर करता येणार आहे.

या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्टये :

  1. ३०० हून अधिक GIS स्तर आहेत.
  2. LiDAR डेटा व सॅटेलाइट इमेज वापरून १२ लाख ५० हजार वैशिष्ट्ये GIS वर तयार करण्यात आले आहे.
  3. २ लाख २० हजारहून अधिक बिल्डिंग फूटप्रिंट्स सॅटेलाईट इमेजवर डिजीटल मार्किंग करण्यात आली आहे.
  4. ८ हजार हून अधिक लिनियर किमी रस्त्यांची नोंद (Marking) GIS वर डिजिटल करण्यात आली आहे.
  5. ८७० हून अधिक लिनीअर किमी ड्रेनेज लाईनची GIS वर नोंद आहे.
  6. ३५० हून अधिक लिनिअर किमी पाईपलाईनची GIS वर नोंद आहे.
  7. १ लाख ४० हजार हून अधिक ड्रेनेज / चेंबरची नोंद करण्यात आली आहे.
  8. ३८० हून अधिक पूल आणि उड्डाणपूलांची GIS वर नोंद झाली आहे.
  9. ७० हजारहून अधिक पथदिवे नोंदविले गेले आहेत.
  10. प्रभावी प्रशासन अंमलबजावणीसाठी शहराची ३६० दृश्ये GIS वर उपलब्ध आहेत.

महानगरपालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे, नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड मनपा व स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने जीआयएस प्रणाली हाती घेण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने राबविलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे, संबंधित विभागातील अधिकारी – कर्मचारी यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. तसेच, कामकाजाला गती मिळणार आहे. मनपाच्या संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना एका क्लिकवर मनपाच्या सुविधांची ठिकाणे पाहता येणार आहे. त्यानुसार, आवश्यक माहिती संपादित करून अहवाल तयार करण्यात मदत होणार आहे.

शेखर ‍सिंह, आयुक्त–पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button