Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

पत्नीला माहेरी का जाऊ देत नाही?, रागाच्या भरात मुलाचा वडिलांवर तलवारीने हल्ला

औरंगाबाद : पत्नीला माहेरी जाण्यासाठी नकार देणाऱ्या वडिलांवर संतापलेल्या मुलाने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आमीर इरफान शेख (२२, रा. रहिम नगर, अलमतश कॉलनी ) असे आरोपीचे नाव आहे. यात इरफान शेख गंभीर जखमी झाले आहे. आमीर हा जिन्सी परिसरात गाड्यांचे सीट कव्हरचे काम करतो. तर इरफान हे खासगी नोकरी करतात.काही महिन्यांपूर्वीच आमीरचा विवाह झाला आहे. रविवारी आमीरच्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. यावेळी इरफान हे देखील घरीच होते. त्यात आमीरच्या पत्नीने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आमीरने आवरुन पत्नीला सोडण्याची तयारी केली. मात्र, अमीरचे वडील इरफान यांना हे कळताच त्यांनी सुनेला माहेरी जाण्यास विरोध केला.

दरम्यान, मेव्हण्यासमोरच बाप-लेकात वाद सुरू झाला. वाद टोकाला पोहोचले आणि संतापाच्या भरात आमीरने घरातील तलवारीच्या आकाराची गुप्ती सदृश्य हत्याराने थेट वडिलांच्या डोक्यात वार केले. त्यानंतर पोटात मागील बाजूने हल्ला केला. यात अमीरचे वडील गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. त्यांच्या पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांनी घराकडे धाव घेत त्यांना रुगणालयात दाखल केले.घटनेची माहिती कळताच जिन्सी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आई वडिलांना रुग्णालयात घेऊन जाताच त्याने पत्नी, मेव्हण्याला पाठवून दिले. त्यानंतर स्वत:ने घरातले सर्व रक्त पुसले. स्वत:चे कपडे बदलले. गुप्ती पाण्याने धुत कपाटाखाली लपवून ठेवली. त्यानंतर घराला कुलूप लावून पोबारा केला. उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी पथकासह शोध सुरू केला. तेव्हा नारेगावमध्ये फिरताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आमीरला अटक करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button