breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला पोलिसाबाबत गैरवर्तन, भंडा-यातील भाजप आमदाराला अटक

मुंबई |महाईन्यूज|

एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार चरण वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. १६ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत आमदार चरण वाघमारे यांनी गैरवर्तन केलं आणि त्याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे बाजार समितीच्या परिसरात कामगारांसाठी काही साहित्य वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गर्दी असल्याने एका गरोदर महिलेला तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकारी मदत करु लागल्या. त्याच दरम्यान भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी त्या गरोदर महिलेसोबत बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर केला. गरोदर महिलेसोबत बोलताना योग्य भाषेचा वापर करण्याचं महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, जिभकाटे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button