breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?

Rohit Sharma : आगामी आयपीएल हंगामाआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आयपीएलमध्ये कर्णधार नसणार आहे. मात्र या निर्णयामुळे रोहितचे चाहते नाराज झाले आहेत. कारण रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवताच मुंबई इंडियन्सचे जवळपास ८ लाख फॉलोअर्स कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचं नेमकं कारण काय?

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्यामागचं कारण म्हणजे मागील तीन हंगामात खराब कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये अखेरची आयपीएल जिंकली होती. त्यानंतर मुंबईच्या संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा  –  भाजप नेत्याच्या मुलाने रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, महिला आयोगाकडून दखल 

२०२१ आणि २०२२ मध्ये मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्येही स्थान पटकावता आले नाही. तर २०२३ मध्ये मुंबईच्या संघ फक्त क्वालिफाय पर्यंत पोहचु शकला. त्यामुळे मागील तीन हंगामात मुंबई इंडियन्सचा आलेख वाढलाच नाही.

रोहित शर्माची आजवरची कामगिरी

  • रोहित २०११ मध्ये मुंबईच्या संघात सामील झाला होता.
  • यानंतर २०१३ मध्ये त्याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली.
  • रोहितनं त्याचवेळी प्रथमच संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली होती.
  • यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button