breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजप नेत्याच्या मुलाने रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, महिला आयोगाकडून दखल

मुंबई : पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सदर युवती ही गंभीर जखमी झाली असून त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

अश्वजीत आणि प्रिया सिंग यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. सोमवारी रात्री तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली. त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. अर्ध्या तासानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं तिला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रियाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला वाचा फोडली.

हेही वाचा  –  ‘मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला’; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थिपकीय संचालकांचा मुलागा अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरूणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button