breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri Chinchwad Crime News | ठाकरे गटाच्या विभागप्रमुकाच्या मुलाची हत्या

पिंपरी  : विशाल विजय थोरी (वय २४, रा. विकासनगर, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, तो ठाकरे शिवसेनेचे देहूरोड विभागप्रमुख आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर विजय थोरींचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांनीच याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात आज फिर्याद दिली.

पूर्वीच्या किरकोळ भांडणातून पाचजणांनी सिमेंटची कुंडी, गट्टू आणि लाकडी दांडके डोक्यात घालून विशालचा निर्घृण खून केला. त्यातील चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाजूक असलेल्या देहूरोडमध्ये सध्या चाललंय, तरी काय अशी परिस्थिती आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तेथील दोन पोलिसांना काल (ता.५) बडतर्फ करण्यात आले, तर एक पीएसआय आणि एपीआय सस्पेंड झाले.

हेही वाचा – जागावाटपावरुन महाविकास आघाडीत वाद? प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

त्याजोडीने देहूरोडच्या एसीपींचे पाच लाखांच्या लाचखोरीत नाव आल्याने त्यांची कंट्रोलला बदली झाली. हे कमी की काय काल रात्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना  देहूरोड विभागप्रमुखाच्या एकुलत्या एका मुलाचा ठेचून खून करण्यात आला.

कॉलेज विद्यार्थ्याला गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळल्याने देहूरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डीबी) पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ आणि त्यांच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणी आणि अपहऱणाचा गुन्हा गेल्या महिन्यात नोंद झाला. त्यात या दोन पोलिसांना अटक झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लगेच त्यांना निलंबित केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button