breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोणाचे प्रश्न नाही सुटले? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र गेल्या दहा दिवसांत विदर्भासह राज्यातील शेतकरी, युवा, महिला, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी, होमगार्ड, आदीवासी या सर्वच घटकांसह मराठा आरक्षण, शिक्षक भरती, ड्रग्जवर नियंत्रण, आरोग्य खात्यातील अनागोदी हे सर्व प्रश्न आहे तसेच आहेत. कोणाच्याही हाती काही आले नसल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला आहे.

विरोधीपक्षातील आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, सतेज पाटील, रोहित पवार आणि इतर आमदार उपस्थित होते.

हेही वाचा  –  महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा? ११ नवीन रूग्णांची नोंद

विरोधी पक्षाच्या आमदारांनी यावेळी, शेतकऱ्याला मदत मिळाली का?.. नाही.. नाही.. पेपरफुटीवर कडक कायदा झाला का?.. नाही.. नाही.. नाही…, परीक्षा फी कमी झाली का?.. नाही.. नाही.. नाही.., अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., आशा सेविकांचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., संगणक परिचालकांचे प्रश्न सुटले का?.. नाही.. नाही.. नाही.. होमगार्डचे प्रश्न सुटले का? नाही.. नाही.. नाही.., निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्या मान्य केल्या का? नाही.. नाही.. नाही.., महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचे प्रश्न सोडवले का? नाही.. नाही.. नाही.., खेळाडुंना थेट नियुक्ती दिली का? नाही.. नाही.. नाही.., आदिवासी बांधवांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., राज्यातील पोलीस पाटील यांच्या मागण्यांना न्याय दिला का? नाही.. नाही.. नाही.., १०२,१०८ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्या मान्य केल्या का? नाही.. नाही.. नाही.., शिक्षक भरती सुरु केली का? नाही.. नाही.. नाही.., प्राध्यापक भारती केली का? नाही.. नाही.. नाही.., शेतकरी आत्महत्या थांबल्या का? नाही.. नाही.. नाही.., महिलांसाठी शक्ती कायदा आणला का? नाही.. नाही.. नाही.., ड्रग्सवर नियंत्रण आणते का? नाही.. नाही.. नाही.., आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या का? नाही.. नाही.. नाही.., कापूस-संत्रा आणि इतर सेट उत्पादक सेटकरांना न्याय मिळाला काय? नाही.. नाही.. नाही.. आशा घोषणा देण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button