breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्र्यांची स्ट्रॅटेजी, आदित्य ठाकरेंची खंबीर साथ, मंत्र्यांचंही जातीने लक्ष, सेनेचं जबरदस्त प्लॅनिंग

मुंबई : राज्यसभेच्या निकालातून धडा घेऊन शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत जोरदार प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनिती आखली. प्लॅनिंगनुसार ५ आमदारांचा ग्रुप विधिमंडळात मतदान करण्यासाठी येतो आहे. स्वत: आदित्य ठाकरे प्रत्येक आमदारावर जातीने लक्ष ठेवून आहेत. प्रिफरेन्शिल वोटिंग करताना गडबड होऊ नये, यासाठी आमदारांची विशेष कार्यशाळा घेतलेली असतानाही सेना खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब पुन्हा पुन्हा आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शन करत आहेत. हेतू हाच आहे की राज्यसभेला मतांचं जे गणित चुकलं, त्याची विधान परिषदेला पुनरावृत्ती होऊ नये.

राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. शिवसेना सोडता सर्वच पक्षांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

मतदान सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडून सकाळच्या घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना ५ आमदारांच्या गटाने मतदान करावं. मतदान करताना कुणीही गडबड करु नये. ज्या प्रमाणे मतदानाच्या सूचना दिल्यात, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या. इकडे सकाळी ११ वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काही आमदारांना घेऊन बसमधून विधिमंडळात पोहोचले. त्यानंतर आमदारांचा गट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचला. यावेळीही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना योग्य त्या सूचना केल्या. मतदान करेपर्यंत आदित्य ठाकरेही आमदारांच्या गटांना मतदानासंबंधी सूचना देत होते. प्रिफरेन्शिल वोटिंग करताना गडबड होऊ नये, मत बाद होऊ नये, यासाठी आवश्यक ती सगळी काळजी घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आदित्य ठाकरे जातीने करत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button