breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा? ११ नवीन रूग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३५ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २७ रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. याशिवाय ठाणे जिल्ह्यात ५, पुणे २ आणि कोल्हापुरात १ रूग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.

सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 चा पहिला रूग्ण केरळ मध्ये आढळला आहे. केरळ मध्ये ११५ नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात कोरोनाचे सक्रिय रूग्णांची संख्या १८२८ वर पोहोचली आहे. केंद्र सरकार अलर्ट मोडवर असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा  –  शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा 

ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी सांगितले की, ८ डिसेंबर रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील आरटी-पीसीआर नमुन्यात कोरोनाचा नाव व्हेरिएन्ट आढळला. येथील एका महिलेत इन्फ्लूएंझासारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती आणि ती आता कोविड-१९ मधून बरी झाली आहे. नवीन कोविड प्रकाराबाबत केंद्राने राज्य सरकारांना एक अॅडव्हायजरी देखील जारी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button