breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेकरांचा आनंदोत्सव! : आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे मानले आभार!

पुनावळे कचरा डेपो रद्द करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यासाठी दिले धन्यवाद!

पिंपरी : पुनावळे येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द झाला. पुनावळेकरांच्या लढ्याला यश मिळाले. आमदार अश्विनी जगताप यांनी प्रभावीपणे लक्षवेधी मांडली. तसेच, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त, राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याबाबत पुनावळेकर ग्रामस्थ आणि सोसायटीधारकांनी शंकर जगताप याना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष राहुल काटे, नवनाथ ढवळे, सुरेश रानवडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संत काका व इतर ग्रामस्थ व सोसायटी सदस्य उपस्थित होते.

पुनावळेतील प्रस्तावित कचरा प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुनावळेकर रहिवाशींच्या वतीने अनेक वर्षपासून लावून धरली आहे. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी प्रयत्न केले. २००८ पासून याबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. त्याला अखेर यश मिळाले.

https://twitter.com/sachinlondhe/status/1736833412387025252

हेही वाचा – महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा? ११ नवीन रूग्णांची नोंद

दरम्यान, प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा कायमचा रद्द करावा अशा मागणीची निवेदन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपाचे युवा नेते नवनाथ ढवळे यांच्या सह पुनावळेकरांनी दिले होते. सदरचा प्रश्न आमदार जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात मांडावा अशी ही विनंती करण्यात आली होती.

संबंधित जागेवर कचरा डेपो झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, पाणीपुरवाठा, हवा प्रदूषण, पर्यावरण संवर्धन असे अनेक प्रश्न निर्माण झाले असते. काही नागरिक पुनावळे सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शासनाने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती.

भाजपा उपाध्यक्ष राहुल काटे म्हणाले की, हिवाळी अधिवेशनातच पुनावळेत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था असून शाळा, महाविद्यालये झाली आहेत. लोकांचा प्रस्तावित कचरा डेपो ला प्रचंड विरोध आहे. वाढलेली लोकवस्ती विचारात घेता पुनावळेत कचरा डेपो केला जाणार नसल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. पुनावळे करांच्या मागणीला यश आल्याने तसेच भाजप आमदार अश्विनी जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधीमुळे सदर चा प्रकल्प रद्द करण्यात आला. याबाबतचा आनंद पुनावळे ग्रामस्थांनी, भारतीय जनता पक्षचे शहराध्यक्ष शंकर जगताप यानां पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला. तसेच, केलेल्या पाठपुराव्याबाबत आभार व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button