breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी पदी किरण गायकवाड यांची नियुक्ती ?

  • डीपीसीच्या बैठकीत नियुक्तीबाबत झाला निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या जनसंपर्क अधिकारीपदी किरण गायकवाड लवकरच रुजू होणार आहेत. अनैतिक संबंधातून एका महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील गुन्ह्यातून ते निर्दोष सुटल्याने त्यांना पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय डीपीसीच्या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याविरुध्द 2013 मध्ये संगमनेर येथील एका महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी किरण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु, गायकवाड यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत फौजदारी गुन्ह्यातून सेवानिलंबित असलेल्या आठजणांपैकी दोघांचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्या दोघांना पालिका सेवेत रुजू करून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रिडा विभागातील लिपीक विशाल भोईर यांच्या प्रस्तावावर समितीत विचारविनिमय होऊन दोघांनाही पालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

अण्णा बोदडेंची उडणार ‘विकेट’

किरण गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या संपर्क अधिकारी पदाचा सुत्रे अण्णा बोदडे यांच्या हाती देण्यात आली. आता संबंधीत गुन्ह्यातून गायकवाड यांची निर्दोष मुक्तता झाल्याने ते लवकरच जनसंपर्क अधिकारी पदाची सुत्रे घेणार आहेत. त्यामुळे अण्णा बोदडे यांच्याकडील जनसंपर्क अधिकारी पदाचा पदभार काढून घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button