breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Whatsapp घेऊन येतंय एक भन्नाट फीचर्स! डॉक्युमेंट फाईल शेअर करणं होणार सोपं

Whatsapp : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक अपडेटेड फिचर्स घेऊन येणार आहे. या नवीन फीचर्समध्ये WhatsApp डॉक्युमेंट शेअरिंग अधिक सोपी करण्यासाठी कंपनी एक नवीन ‘डॉक्युमेंट पीकर टूल’ देणार आहे.

या फीचर्सच्या मदतीने तुम्ही थेट तुमच्या मोबाईलच्या गॅलरीतून फोटो किंवा व्हिडीओ डॉक्युमेंट म्हणून पाठवू शकता. सध्याच्या सुविधेमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर डॉक्युमेंट फाईल शेअर करता तेव्हा तुम्हाला रिसेंट डॉक्युमेंटचा किंवा ब्राऊज डॉक्युमेंटचा पर्याय मिळतो. अशा परिस्थितीत कामाची फाईल शोधण्यासाठी जास्त वेळ लागतो.

हेही वाचा – विराट कोहली ‘या’ खेळाडूचा आहे फॅन; म्हणाला, माझ्या घरी एकच जर्सी..

मात्र नवीन मीडिया पीकर टूलच्या मदतीने तुम्ही गॅलरीमध्ये सहजपणे स्विच करू शकता आणि डॉक्युमेंट म्हणून कोणताही फोटो, व्हिडीओ इत्यादी शेअर करू शकता. सध्या हे अपडेट अँड्रॉईड बीटा २.२३.१९.३ मध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. लवकरच, कंपनी सर्वांसाठी हे फीचर रोलआउट करणार आहे. तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व अपडेट्स मिळवायचे असेल तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button