breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

आयुक्त साहेब… पुनावळेतील ‘त्या’ जागेत सार्वजनिक प्रकल्प उभारा!

जांबे, मारुंजीकरांची मागणी : कचरा डेपो नको, उद्यान, हॉस्पिटल आदी हवे!

पिंपरी: पुनावळेतील कचरा डेपो उभारण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन करीत आहे. त्यासाठी भविष्यात समाविष्ट होणाऱ्या गावांचा दाखला दिला जात आहे. मात्र, जांबे, मारुंजी आदी गावांनी त्यांच्या हद्दीलगत कचरा डपो उभारण्याऐवजी त्या जागेवर सार्वजनिक वापरासाठी एखादा प्रकल्प उभारावा, अशी मागणी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना ग्रामपंचायत जांबे आणि ग्रामपंचायत मारुंजी यांनी गावकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुनावळे आणि परिसरात लोकसंख्या आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मोठ्या गृहनिर्माण सोसायटी उभा राहिलेल्या आहेत. मात्र, या भागात शासकीय हॉस्पिटल, स्विमिंग टॅन्क, गार्डन, खेळाचे मैदान अथवा पर्यटनाच्या दृष्टीने कोणताही सार्वजनिक प्रकल्प विकसित केलेला नाही. 

कचरा डेपो उभारल्यास या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच, डेपोसाठी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड करुन प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होणार आहे. जांबे आणि पुनावळे गावची शिव एकच असून, जांबे गावातही मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लोकवस्ती विरळ असलेल्या ठिकाणी किंवा शहराबाहेर कचरा डेपो विकसित करावा. ज्यामुळे स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांना त्रास होणार नाही. 

चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण, कचरा डेपो पुनावळेत?

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन वृक्षाच्छादित पुनावळेतील वनविभागाची जागा ताब्यात घेणार आहे. त्या बदल्यात वन विभागाला चंद्रपूर येथील जागा देण्यात येणार असून, त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पण, चंद्रपूरमधील वृक्षारोपणाचा पुनावळे, जांबे, मारुंजी या भागातील नागरिकांना काय फायदा? असा प्रश्न आहे. पुनावळेत वन विभागाची २२.८ हेक्टर जागा महापालिका घेण्यासाठी आग्रही आहे. त्या बदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला आहे. वृक्षाच्छादीत असलेला हा परिसर समाविष्ट गावांसाठी ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहे. त्यामुळे राज्याच्या वन विभागाने वृक्षतोड आणि पर्यावरण संवर्धन याचा विचार करावा, अशी स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांची मागणी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button