breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

काँग्रेस, राष्ट्रवादीला आम्ही चालत नाही : प्रकाश आंबेडकर

पिंपरी : अंधेरी पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढवण्यात आली. त्या ठिकाणी ठाकरे गटाला प्रचंड सहानुभूती होती. ही बाब लक्षात घेवून भाजपाने शिताफीने माघार घेतली. आता कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघ शिवसेनेला (ठाकरे गट) सोडावी, अशी आमची भूमिका होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडी चालत नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला ताकदवर उमेदवार द्यायचा नव्हता, हे भाजपाधार्जिणे गमक आमच्या लक्षात आले, अशी खळबळजनक टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, दि. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०१४ च्या विधानसभेत चिंचवड मतदार संघात ४० हजाराच्या घरात मते मिळाली आहे. पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत उभे केले. त्यावेळी राष्ट्रवादीला कमी मते मिळाली. या निवडणुकीत पार्थ पवार कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे लोकसभेची तयारी आहे, असेही म्हणता येणार नाही. राष्ट्रवादीला आम्ही आवाहन केले होते की, राहुल कलाटे यांना उमेदवारी द्या आम्हीसुद्धा प्रचार करतो. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. 

सहा महिन्यांसाठी लागलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, तसेही झाले नाही. चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागा शिवसेनाला (ठाकरे गट) दिल्या असत्या, तर काय बिघडले असते? उलट, ठाकरे गटाकडे त्यांची पारंपरिक मते कायम आहेत, हे सिद्ध झाले असते आणि त्याचा फायदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत झाला असता, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आम्ही शिवसेनेसोबत…शब्द दिला…

‘‘शिवसेना ठाकरे गटाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून हिरमुसून जावू नका. आम्ही आपल्यासोबत राहणार आहोत. एकदा शब्द दिला तो दिला. परिस्थिती बदलली म्हणून शब्द फिरवणार नाही. २०२४ च्या निवडणुकांपर्यंत आपण एकत्र आहोत. शिवसैनिकांना पुन्हा ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. तसेच, कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी वाचवायच्या असतील, भाजपाला मतदान करु नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button