TOP Newsक्रिडाटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त जत येथे मोफत आरोग्य शिबीर उत्साहात

  • सागर शिनगारे, डॉ. रुपालीताई शिनगारे यांचे राहित पाटील यांनी केले कौतुक

जत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त जत एकात्मिक विकास फाऊंडेशन व माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन तसेच डॉ. म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी अथणी रोड वरील प्रतिक सिनेमा हॉल समोरील सोनाली क्लिनिक या ठिकाणी सदर शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी जत परिसरातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच इतरही नागरीकांनी सुमारे १००हून अधिक रुग्णांनी तपासणी करून या शिबाराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. रुपालीताई शिनगारे यांच्या या समाजहिताय कार्याबद्दल रोहित पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आर आर पाटील, माजी सभापती सुरेश शिंदे सरकार, रमेश पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका, कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, युवक अध्यक्ष स्वप्निल शिंदे, जत शहराध्यक्ष शफिक इनामदार, मीनाक्षी ताई अक्की, सिद्धू मामा शिरसाड, मदन पाटील, राजू मुल्ला डॉ. म्हैशाळकर-शिंदे, शेती अधिकारी नितीन पाटील, एन.डी.कांबळे सर, अविनाश वाघमारे, विकास लेंगरे, हेमंत चौगुले, कलाप्पा पाचंगे, अनिल सूर्यवंशी, राघवेंद्र चौगुले, पापा हुजरे, लक्ष्मण कद्रे, पै. तानाजी शिंदे, पै. भाऊसाहेब पाटील, प्रसाद व्हनकट्टे, वैभव शिंदे, वैभव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी सैनिक सुभेदार अनिल शिंदे व सुभेदार भारत नरुटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले व आभार युवा नेते श्रीकांत सोनवणे यांनी मानले.

आरोग्य शिबिरामध्ये विविध मोफत तपासण्या
गुडघे दुखी, खुबा दुखी, सांधे दुखी, सांध्याच्या इजा, पाठ दुखी, मणक्याचे विकार, अस्थिव्यंग, पायांना मुंग्या येणे, पायांना बाक येणे, लहान मुलांचे हाडाचे आजार इत्यादी आजारांवर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

समाजामध्ये चांगला संदेश देण्याचे काम…
यावेळी रोहित पाटील बोलताना म्हणाले की, सागर शिनगारे या युवा कार्यकर्त्याने आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. स्वतःच्या हिंमतीवर, जोरावरती समाजाची शक्य तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न सागर शिनगारे यांचा निश्चितच अनुकरणीय आहे. आज आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. दोन तीन वर्षापूर्वी कोरोना सारख्या महामारीने सांगली आणि जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत होती. कवळेमहांकाळ तालुक्याला 50 बेडचे हॉस्पिटल आपण सुरू केले. कुणालाही आरोग्य सेवा कमी पडू देणार नाही. आदरणीय आर. आर. आबा यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आज राजकारणाची परिस्थिती बघितली तर एकमेंकांची हाडे मोडण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना सागर शिनगारे यांनी हाडे जोडण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून केले आहे. ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. समाजामध्ये चांगला संदेश या माध्यमातून दिला जात आहे. दुष्काळी भागातून येऊनही रुपाली ताई शिनगारे यांनी अतिशय कौतुकास्पद काम केलेले आहे, असे कौतुकोद्गार रोहित पाटील यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक नेत्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत असताना मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करतो. आता पर्यंत सोनाली क्लिनिकच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी रुपयांच्या मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. सध्या अॅनिमिया मुक्त जत ही मोहिम आम्ही डॉ. रुपाली शिनगारे यांच्या माध्यमातून राबवत आहोत. शक्य तितकी सामाजिक कार्ये करण्याचा आम्ही ध्यास घेतलेला आहे.

– सागर शिनगारे, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button