breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

संदीप बिष्णोई यांनी स्विकारला पिंपरी चिंचवड आयुक्तपदाचा पदभार

पिंपरी |महाईन्यूज | प्रतिनिधी |

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी त्यांच्या पदाचा पदभार आज स्विकारला आहे. आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात झाली असून संदीप बिष्णोई यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी काढले होते.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन करून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली होती. आर.के. पद्मनाभन यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पहिले आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता. सेवानिवृत्ती जवळ आल्याने तसेच इतर काही कारणांमुळे आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. नवे आयुक्त संदीप बिष्णाई हे सध्या मुंबईत वैधमापनशास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते. बिष्णाई यांना तात्काळ पिंपरी चिंचवडच्या आयुक्त पदाचा पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आज पदभार स्विकारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button