breaking-newsपिंपरी / चिंचवड

धर्मादाय अंतर्गत सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार द्या – बाबा कांबळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गोरगरिबांना धर्मादाय अंतर्गत रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.

यासाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने बाबा कांबळे यांनी धर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख, उपयुक्त नवनाथ जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली. धर्मादाय अंतर्गत पुणे विभागात येणा-या एकुण 54 हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी यांची देखील भेट घेण्यात आली. त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात आदित्य बिर्ला, डॉ. डी. वाय. पाटील, धनश्री, स्टर्लिंग हॉस्पिटल सह इतर हॉस्पिटलमध्ये कष्टकरी जनतेला मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी करण्यात आली.

रिक्षा चालक, टपरी पथारी हातगाडी धारक, कागद काच पत्रा वेचक, धुणी-भांडी स्वयंपाक साफसफाई कामगार असे काबाडकष्ट करणाऱ्या जनतेला धर्मदाय आयुक्त अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी अध्यक्ष कांबळे यांनी केली. यावेळी लोकशाही संस्था अध्यक्ष अजय लोंढे, भीमा कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साबळे आदी उपस्थित होते.

आत्तापर्यंत धर्मादाय अंतर्गत निर्धन आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन हजार कोटी रुपयांचे मोफत उपचार झाले असल्याचे धर्मदाय उपायुक्त दिलिप देशमुख यांनी सांगितले. गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, कोरोना परिस्थितीत बेड उपलब्ध नाहीत. अगोदर ५० रुपये भरा अन्यथा उपचार केले जाणार नाहीत.असे विविध कारणे सांगून गोर-गरीब जनतेला कष्टकरी जनतेला आरोग्य उपचार दिले जात नाहीत. यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. अनेक व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. याबाबत तक्रार करून देखील न्याय मिळत नाही. यामुळे धर्मादाय उपायुक्त यांची भेट घेतली असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button