breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#WAR AGAINST CORONA: खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन

देशभर कहर केलेल्या करोना विषाणुशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे.

देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय झाला असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या देशावर आलेलं करोनाचं संकट हे खूप मोठं आहे. त्यामुळे या संकटाशी सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. याच विषयावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला असंही जावडेकर यांनी  म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button