breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! सासूसोबत अनैतिक संबंध; जावयाने केला गळा आवळून खून

पुणे |

पुण्यात जावयाने सासूचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध होते. बिबवेवाडी येथे एकत्र राहत असताना त्यांचात सतत वाद होत होते. शनिवारी यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि जावयाने सासूचा गळा आवळून खून केला. अनारकली महम्मद तेरणे (वय ४५) असे मयत सासूचे नाव असून आसिफ दस्तगीर आत्तार (वय २६) आरोपी जावईचे नाव आहे. ते दोघे मूळचे कर्नाटक येथील होते. वर्षभरापासून ते बिबवेवाडी येथे एकत्र राहण्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनारकली महम्मद तेरणे या महिलेच्या मुली सोबत आरोपी आसिफ दस्तगीर आत्तार याचे लग्न झाले होते.

पण लग्नानंतर काही दिवसांनी जावई आणि सासू यांच्यात प्रेम संबध असल्याचे अनारकली यांच्या पतीला आणि मुलीला समजले. त्यानंतर आरोपीची पत्नी त्याला सोडून निघून गेली. यामुळे मयत सासू आणि जावई कर्नाटकमधून पुण्यात राहण्यास वर्षभरापूर्वी आले होते. पुण्यात आल्यावर आरोपी आसिफ हा मिळेल ते काम करून घर चालवत होता. आसिफ हा अनारकलीकडे जेवण व्यवस्थित करत नसल्याची तक्रार करत असे. त्यावर घरात खर्चासाठी पुरेसे देत नसल्याची तक्रार आसिफची सासू करत असे. या कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. शनिवारी देखील दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर आसिफने ओढणीच्या सहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच आसिफला अटक केली आहे. बिबवेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वाचा- #Covid-19: पुण्यात सोसायटी, क्लब हाऊसमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम; खासदार अमोल कोल्हेंकडून पोलखोल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button