breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

धक्कादायक! नवरात्रीत गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या उत्सावादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १३ वर्षींय मुलाचा समावेश आहे.

शुक्रवारी २४ वर्षीय तरूण गरबा खेळताना अचानक कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कपडवं येथील एका १७ वर्षीय मुलाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – विधानसभा आमदारांची संख्या वाढणार; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान 

नवरात्रीच्या पहिल्या सहा दिवसांत आपत्कालीन विभागाला हृदयाशी संबंधित समस्यांसाठी ५२१ फोन कॉल आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी सुमारे ६०९ फोन कॉल आले आहेत. हे कॉल्स संध्याकाळी ६ ते पहाटे २ च्या सुमारास आले आहेत. साधारणत: या कालावधीत गरबा साजरा केला जातो. या घटनांनंतर राज्य सरकार सतर्क झालं असून गरबा स्थळांजवळील सर्व सरकारी रुग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना (CHCs) अलर्ट जारी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button