breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी पुरस्कृत राहूल कलाटे यांच्यासाठी आता संभाजी ब्रिगेड उतरली मैदानात

  • मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने जाहीर केला पाठींबा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जातीय तनाव वाढला आहे. बेरोजगारी वाढली. अनेक उद्योगधंद्यांचे स्थलांतर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले भाजप सरकार महाराजांचा अपमान करू लागले आहे. अशा सरकारला येणा-या विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका जाहीर केली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून संभाजी ब्रिगेडने अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिध्दी पत्रक काढून पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शास्तीकर रिंग रोड अनाधिकृत बांधकाम हे प्रश्न सोडवतो म्हणून या शहरातील गेल्या पंचवार्षिकला निवडून आलेल्या आमदारांनी यातील एकही प्रश्न आजपर्यंत सोडवलेला नाही. त्यातच महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने या फडणवीस सरकारच्या काळात जातीय तनाव वाढलेला आहे. असा धक्कादायक अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे.

छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने मराठा बहुजन समाजाला पिळून खाताना दिसत आहे. तसेच मोदी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी कित्येक पटीने वाढली आहे. याला सर्वस्वी फडणवीस सरकारच कारणीभूत आहे. तसेच, शेतकऱ्यांना फसव्या कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला आहे.

आर्थिक मंदीला फडणवीस सरकारच जबाबदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जनतेचे मत घेतात आणि शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक अरबी समुद्रात बांधु असे आश्वासन देणारे ह्या सरकारच्या काळात एक विटही रचली गेलेली नाही. ८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप या सरकारवरचा आहे. तसेच, इंदु मिलमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे भूमिपूजन करून तिथेही एक विट रचली गेली नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी बेरोजगारी रस्त्याची दुरवस्था पाण्याचा प्रश्न आर्थिक मंदी याला सर्वस्वी फडणवीस सरकार हेच जबाबदार असल्यामुळे आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देत आहे, कार्याध्यक्ष सतिश काळे यांनी जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button