breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील वॉकहार्ट हॉस्पीटलमधील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबई|महाराष्ट्रात सोमवार सकाळी नवीन 33 रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 781 झाला आहे. यापैकी 19 रुग्ण पुणे, 11 मुंबई, 1-1 सातारा, अहमदनगर आणि वसईचा आहे. तर मुंबईजवळील वसई-विरारच्या नालासोपारा परिसरात एका 65 वर्षीय संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या वॉकहार्ट हॉस्पीटलला क्वारेंटाइन एरिया घोषित केला आहे. मुंबई सेंट्रलमधील या हॉस्पीटलमध्ये कोणत्याही नवीन रुग्णाला दाखल करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आयुक्त सुरेश काकानी म्हणाले की, ‘‘ही खुप दुर्भाग्याची बाब आहे की, हॉस्पीटलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संक्रमण कसे पसरू शकते. सर्वांनी सावधगिरीने काम करायला हवे होते. या घटनेच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.’’

सध्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 270 पेक्षा जास्त कर्मचारी आणि डॉक्टरांच्या चाचण्या केल्या जात आहेत. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एका 38 वर्षीय पुरुष नर्समध्येदेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, यानंतर हॉस्पीटलच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आज संध्याकाळपर्यंत यांच्या रिपोर्ट येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button