breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

# War Against Coroana : लॉक डाऊनमध्ये गरजूंना अन्नधान्य (शिधा) अथवा जेवण पुरवा; नागरिकांनी मागणी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजविला आहे राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन (संचारबंदी)च्या कालावधी ३ मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे.  लॉकडॉऊनच्या काळात शहरातून गावी जाणा-या  नागरीकांना प्रतिबंध करुन त्यांची राहण्याची, खाण्याची सोय मनपाने शहरातील वेगवेगळ्या निवारा केंद्रात केलेली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा दिला जात असून त्यांची मनपाने काळजी घेतली आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मनपाचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामगार वर्ग जास्त आहे त्यापैकी ब-याच कामगारांचे हातावर पोट असून, दैंनदिन मोलमजुरी करुन आपली उपजिविका चालवितात. सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे या नागरीकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनमुळे घर सोडू शकत नाहीत व घरी खायला काही नाही अशी अवस्था झालेली आहे.

मागील पंधरा दिवसापासून अशा नागरीकांना स्थानिक नगरसदस्यांकडून, सामाजिक संस्था यांच्याकडून यथाशक्ती मदत करण्यात आली आहे. अशा नागरीकांना मदत करणेबाबत मनपाकडे चौकशी केली असता मनपाच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यास मदत पुरविली जाईल असे सांगण्यात आले. परंतु मनपाच्या हेल्पलाईनवर शहरातील गोरगरीब  झोपडपट्टीतील नागरीक  संपर्क साधू शकणार नाही, अथवा साधता येणार नाही. त्यामुळे या लोकांची उपासमार होणार आहे.

प्रत्येक वार्डात स्थानिक नगरसदस्यांशी समन्वय ठेऊन साधारणपणे ३०० नागरीकांच्या शिधा अथवा जेवणाची सोय करण्यात यावी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button