breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

3 तासांनंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 2 पोलीस जखमी

जम्मू काश्मीर | श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नागरोटा टोल प्लाझावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सुरक्षा दलानं चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. जवळपास तीन तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत 2 पोलीस जखमी झालेत. दहशतवादी एका ट्रकमधून टोल प्लाझावर पोहोचले होते.

जेव्हा तपासणीसाठी ट्रक थांबवण्यात आला तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. आज पहाटे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला केला गेला. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याची माहिती आहे.

एका वृत्तसंथेने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बान टोल प्लाझावर ट्रकमधून प्रवास करणाऱ्या जवानांवर 3-4 दहशतवाद्यांच्या पथकाने गोळीबार केला. जम्मूचे आयजी मुकेश सिंह म्हणाले, पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी तपासासाठी ट्रक रोखला. ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यात एक पोलिस जखमी झाला. दरम्यान या भागात काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे.

गेल्या चार ते पाच वर्षातील ही तिसरी किंवा चौथी घटना आहे, ज्यात दहशतवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील चौक्यांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा दलानं नगरोटा येथील ब्लॉकवर वाहनांची तपासणी करत असताना ही घटना घडली. असे सांगितले जात आहे की, अजूनही तीन अतिरेकी या भागात लपले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button