‘संभाजी भिडेंना कारागृहात चक्की पिसायला लावणार’; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस पक्ष तथा महात्मा गांधी व देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नेत्यांबद्दल भिडे अतिशय खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. या भिडे ऊर्फ समाजात लागलेल्या किड्याला जेलात चक्की पीसिंग पिसिग करायला लावणारं आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर हे आम्ही नक्की करू.
हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा
राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी या समाजात वळवळ करणाऱ्या किड्याला जेल मध्ये टाकून चक्की पिसिंग पिसिंग करायला लावणार, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्याच्या तिजोरीची सध्या लूट सुरू आहे. फक्त सत्ताधारी आमदारांचाच विकास सुरू आहे. सामान्य नागरिक यापासून वंचित राहतोय, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.