breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

22 आमदारांना ईडीची नोटीस, राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव; राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर शिवसेना भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असं संजय राऊत म्हणाले आहे. ते शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते.

…पण मीही त्यांचा बाप आहे

राऊत म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची पूर्ण तयारी केली आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकी मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे, असा जोरदार उत्तर राऊतांनी दिले.

‘त्या’ 22 आमदारांवर ईडीचा दबाव

भाजपच्या हस्तकांनी त्या 22 आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची तयारी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, हे हस्तक सरकार पाडण्यात अपयशी ठरले, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा दावाही राउतांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button