breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादमध्ये रात्री ढगफुटी सारख्या पावसाचे थैमान; नद्यां, ओढ्यांना पूर तर, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानं

औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारख्या पावसाने थैमान घातले आहे. या तुफान पावसामुळे ग्रामीण भागातील लोकांची धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला आहे, यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसानं झाले आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाणी शेतात साचले तर गावात देखील पाणी शिरले.


औरंगाबाद पैठण जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांपैकी काही दरवाजे दीड फूट काही दोन फूट तर काही दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नदीपात्रामध्ये मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती अवजारे इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यामुळे व कुंडलिका, बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100 टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता अकरा दरवाजे उघडण्यात आलेत. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणेमार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.आता मात्र पावसाने पहाटेच्या सुमारास विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button