breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Mumbai-Pune Expressway : गणेशोत्सवासाठी एक्सप्रेस वेवरून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शनिवार, रविवारच्या सलग सुट्यामुळे बाहेर पडलेल्या पुणे आणि मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. एक्सप्रेस वे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाका ते कुंभवलीपर्यंत ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. हलक्या आणि जड वाहनांच्या या रांगा लागल्या आहेत. आता गणेशोत्सव आणि विकेंडमुळे अनेक जण गावी निघाले आहेत.

हेही वाचा – PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगार किती? संपत्ती किती? वाचा सविस्तर..

यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकडून पुणे शहरात येणारे वाहनधारक ट्रॅफीक जाममध्ये अडकले आहेत. तसेच कोल्हापूर, कोकणात, मराठवाड्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक निघाले आहे. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button