breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत २४ तासांत दीड लाख जणांचे लसीकरण

सांगली |

करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेस समर्थपणे तोंड देण्यासाठी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या महालसीकरण योजनेत निश्चित करण्यात आलेले उदिष्ट  ९८ टक्के यशस्वी झाले. बुधवारी २४ तासात दीड लाख लसीकरणाचे उदिष्ट असताना निर्धारित बारा तासात १ लाख  ४६ हजार लाभार्थीचे लसीकरण झाले.

महालसीकरणामध्ये प्रशासकीय यंत्रणेबरोबरच आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधी यांनीही सहभाग घेतल्याने उद्दिष्टपूर्ती गाठता आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. याबद्दल सर्व सहभागी विभागासह लाभार्थीचेही त्यांनी अभिनंदन केले. या मोहिमेत कोविड लसीकरणाचा एकही डोस न घेतलेल्या व पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण ५९४ लसीकरण केंद्रावर  नियोजन करण्यात आले होते.

यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला बाल कल्याण विभाग इत्यादी विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाने आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि अंगणवाडी विभागाने त्यांच्या बालकांच्या पालकांच्या लसीकरणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. ग्रामपंचायत विभागाने गावपातळीवर प्रचार व प्रसिध्दी, मनुष्यबळाची उपलब्धता, वाहतुकीची व्यवस्था इत्यादीद्वारे महत्त्वाचे योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button