breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

स्फोटक प्रकरणातील इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच, धक्कादायक माहिती समोर

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागत आहे. नियमित धक्कादायक खुलासे समोर येत असताना आज एक नवी माहिती समोर आली आहे. स्कॉर्पियो कारबरोबर दिसलेली इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (२५ फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं. दरम्यान ही इनोव्हा कार सापडली असून, शनिवारी रात्री एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.

स्कॉर्पिओ गाडीबरोबर एक इनोव्हा कार होती. ज्यातून स्कॉर्पिओ गाडीचा चालक फरार झाला होता. मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर या गाडीत दोन व्यक्ती दिसून आले होते. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचं समोर आलं होतं. तर इनोव्हा कारच्या मालकाचा शोध घेतला जात होता. मात्र, आता ही कार सापडली असून, मुंबई पोलीस गुन्हे शाखेचीच ही गाडी असल्याचं समोर आलं आहे.

८०० सीसीटीव्ही फुटेज आणि ३० जणांचे जबाब

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांकडून पांढऱ्या इनोव्हाबद्दल माहिती काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. इनोव्हाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. त्याचबरोबर ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले होते. तरीही पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button