breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

आ. रोहित पवार केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीस

  • भाजप जिल्हाध्यक्षांची भेटीवर टीका

नगर |

कर्जत—जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन—तीन दिवसात दिल्लीमध्ये तब्बल आठ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतदारसंघातील प्रश्नांसह काही धोरणात्मक निर्णयांची मागणी केली. आमदार पवार यांच्या या भेटींवर भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून विकास कामांकरता काही मदत होणार नाही, हे लक्षात घेऊनच ते केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेत आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी मंत्र्यांची भेट घेतलेले छायाचित्र ते प्रसिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांसमवेतचे छायाचित्र प्रसिद्ध करत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली आहे.

आमदार पवार यांनी कर्जत—जामखेडमध्ये भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार धक्का देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे यांचे समर्थक असलेल्या काही भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा भाजपमध्ये यापूर्वीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता आ. पवार यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत मतदारसंघाचे प्रश्न मांडले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आ. पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी यांच्यासह विविध विभागाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, गिरीराज सिंग, पुरुषोत्तम रूपाला, डॉ. भागवत कराड, वीरेंद्र कुमार, मुक्तार अब्बास यांची आ. पवार यांनी भेट घेऊन त्यांना निवेदने दिली. या भेटीगाठीची प्रसिद्धीही आ. पवार यांनी व्यवस्थितपणे सूरू केली आहे. केंद्रामध्ये भाजपची सत्ता असूनही पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याशिवाय पक्षाचे अन्य पदाधिकाऱ्यांकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

यासंदर्भात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले, केंद्र सरकारने नगरमध्ये बावळण रस्त्यासाठी १ हजार कोटी, उड्डाणपूल अशी अनेक कामे मंजूर केली आहेत. मात्र त्याची प्रसिद्धी आम्ही करत नाही. राम शिंदे मंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या कामाचे नारळ आमदार पवार अजूनही फोडत आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप पाहता आ. पवार त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून ते प्रसिद्ध करू शकत नाहीत. भाजपचे मंत्री पक्षीय भेदभाव न ठेवता कामे मंजूर करतात. त्यामुळेच भाजपच्या मंत्र्यांसमवेत पवार फोटो काढून प्रसिद्ध करत आहेत. या माध्यमातून पवार नागरिकांची दिशाभूल करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button