breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

३१ डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा यूपीआय आयडी बंद होणार

UPI ID : यूपीआय वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून काही युनिफाइड इंटरफेस पेमेंट म्हणजे यूपीआय अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत. जर एखाद्या यूपीआय आयडीवरून तुम्ही एका वर्षात एकदाही ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर तुमचा आयडी ब्लॉक करण्यात येणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना वापरात नसलेले यूपीआय आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका वर्षापासून कसलाही व्यवहार न झालेले यूपीआय आयडी बंद केले जाणार आहेत. यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे यूपीआय वापरकर्त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी आपला यूपीआय आयडी सक्रिय करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा   –  Talathi Bharti Result : तलाठी भरतीचा निकाल ‘या’ महिन्यात लागणार 

यूपीआय आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा संदेशाद्वारे सूचना देखील पाठवणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे यूपीआय व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. तसेच चुकीचे व्यवहारही थांबतील.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व पेमेंट अॅप्स आणि बँका निष्क्रिय ग्राहकांचा यूपीआय आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरची पडताळणी करतील. एका वर्षापासून या यूपीआय आयडीवरून कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले नसल्यास ते बंद केले जाईल. नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button