breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Talathi Bharti Result : तलाठी भरतीचा निकाल ‘या’ महिन्यात लागणार

Talathi Bharti Result : तलाठी भरती संदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे. तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

त्यामुळे तलाठी भरतीचा निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

हेही वाचा   –  शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास प्लॅन बी तयार? मुख्यमंत्री बदलणार? 

परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली होती. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button