breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युतीचा खटाटोप: शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठीच भाजपचे महासंमेलन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यास शिवसेना नकारात्मक असल्याचे दाखवित असल्यामुळे बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या लोकसभा मतदार संघात अटल संम्मेलन घेतले जात आहे. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याची टिका राष्ट्रवादीचे कारभारी तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली आहे.

राष्ट्रवादीचा सर्वपक्षीय कामगार मेळावा रहाटणी येथे आज होत आहे. त्यानिमित्त शहरात येणे झाल्याने अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ता फजल शेख, नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेना नकारात्मक पवित्रा घेत आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभेत शिवसेनेचे खासदार असताना या मतदार संघात भाजपचा मेळावा घेतला जात आहे. मुख्यमंत्र्यांची होत आहे. या मतदार संघात सभा घेऊन भाजप सेनेवर युतीसाठी दबाव वाढवित आहे. बार्गेनिंग पॉवर वाढविली जात आहे, अशी टिका पवार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button