breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवरांकडे ८० गाड्यांसाठी १५-१६ कोटी कुठून आले? अंजली दमानियांचा सवाल

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकींसाठी कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी ८० गाड्यांचं बुकिंग केलं आहे. यावरून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवरांकडे ८० गाड्यांसाठी १५-१६ कोटी कुठून आले? असा प्रश्न त्यांनी केला.

अंजली दमानिया, ४० स्कॉर्पिओ आणि ४० बोलेरो अशा एकूण ८० गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, या गाड्या कुठून आल्या? त्यासाठी इतके पैसे कुठून आले? एका महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत २४.५० लाख रुपयांच्या आसपास आहे. तर बोलेरोची किंमत १३ लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच या ८० गाड्यांसाठी १५ ते १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे १५-१६ कोटी रुपये कुठून आले? कोणी दिले? अजित पवार यांनी स्वतः दिले की त्यांच्या पक्षाने दिले? मला एका गोष्टीची गंमत वाटते की, या सगळ्या गोष्टी ईडी (सक्तवसुली संचालनालय), एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) आणि निवडणूक आयोगाला दिसत नाहीत का? असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा  –  ३१ डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा यूपीआय आयडी बंद होणार

जो गट अजून पक्ष म्हणून घोषित झालेला नाही, त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून खरेदी केल्या? त्यासाठी पैसे कुठून आले? कोणी देणग्या दिल्या? आता ED/ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत की अजित पवारांनी काबाडकष्ट करून कमावलेले पैसे आहेत? कुठून येतात एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गडी घेणं परवडत नाही, असंही अंजली दमानिया म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button