Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलडाण्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन, मुस्लिम बांधवांना भोंगा भेट

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भोंगा भेट दिल्याची घटना घडली आहे. येथील हिंदू बांधवांनी एकता आणि बंधुत्वच प्रतीक बनत मुस्लिम बांधवांना मशिदीवर भोंगे लावण्यासाठी भोंगाच भेट दिलाय.

राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. भोंगे न उतरवल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन धर्मात तणाव निर्माण होतो आहे. मशिदीवरून भोंगे काढण्यासाठी वातावरण निर्मिती होत आहे. याला अपवाद म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात घडलेलं हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन.

बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे. विशेष म्हणजे या केळवद परिसरात एकही मशीद नाही. तरी, शेजारील किन्होळा मुस्लिम बांधवांना बोलावून ईदच्या शुभेच्छांसह हा भोंगा त्यांना भेट देण्यात आला.

हनुमान चालीसावरून अंबरनाथमध्ये वातावरण गंभीर; मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button