breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

PM किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये

PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६००० रुपये दिले जातात. मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेत आहेत याची माहिती शासनाला मिळू शकलेली नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं देखील बंधनकारक असणार आहे. या दोन्ही गोष्टी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी ६००० रुपयांपासून वंचित राहतील.

हेही वाचा    –    भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? पुरस्कारामध्ये काय मिळते? वाचा सविस्तर..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी किंवा एनपीसीआय आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा एएनपीसीआय केलेले नाही त्यांनी हे काम लवकरात लवकर करुन घ्यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button