breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहशहर अभियंत्याच्या नातेवाईकांची ‘संतपीठ सल्लागार’ म्हणून नियुक्तींचा घाट?

  • संतपीठ’ सल्लागार काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव फेटाळणार
  • अभ्यासासाठी दोन आठवडे प्रस्ताव तहकूब   

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे संतपीठ उभारण्यात येणार आहे. या संतपीठाच्या सल्लागार म्हणून एका सहशहर अभियंत्याच्या नातेवाईकांची वास्तुविशारद नेमणूक करण्यात येणार आहे. याकरिता संतपीठ कामाच्या सल्लागाराला काळ्यात टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यावर स्थायी समिती सभापतींनी हा प्रस्तावांच्या अभ्यासासाठी दोन आठवडे हा प्रस्ताव तहकूब ठेवला असून त्यानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात येणार आहे.   महापालिकेच्या स्थायी समितीची आज (बुधवारी) सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. दरम्यान, संतपीठावर नातेवाईकांची सल्लागार म्हणून वर्णी लागावी म्हणून पुर्वीच्या सल्लागारास काळ्या यादीत टाकण्याचे घाट सहशहर अभियंत्यांनी घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. या संतपीठाच्या इमारतीसाठी तब्बल 45 कोटी 9 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम बी. के. खोसे ठेकेदाराला वाढीव दराने दिल्याचे आरोप झाला. गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशीत कोणत्याही त्रृटी नसल्याचा निर्वाळा करत महापालिकेने ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.

या प्रकल्पासाठी नुयोग जबुवानी या सल्लागार संस्थेची वास्तुविशारद आणि सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. मात्र, हा सल्लागार काम करत नसल्याने संतपीठाचे काम रखडल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने नुयोग जबुवानी या सल्लागाराचे काम रद्द केले होते. सल्लागाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्या जागी निओजन आर्किटेक्ट अॅन्ड कन्सलटंट यांची संतपीठासाठी वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, संत पीठाचे काम सुरु असताना आणि हाच सल्लागार काम करत असताना अचानक बदलण्याचे नेमके कारण काय? असा सवाल करत स्थायी समितीने हा प्रस्ताव दोन आठवडे तहकूब ठेवला आहे.

चिखलीतील संत पीठाचे काम प्रगतीपथावर आहे. नुयोग जबुवानी हाच सल्लागार काम करत आहे. मात्र, अचानक या सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचे नेमके कारण समजले नाही. त्यामुळे प्रस्ताव दोन आठवडे तहकूब केला आहे. अभ्यास करुन सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव फेटाळणार असल्याचे सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले.

अधिका-यांच्या नातेवाईकांसाठी सल्लागार बदली?

महानगरपालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी संतपीठाच्या कामासाठी नातेवाईकांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. त्या अधिका-यांने यापुर्वीचे सल्लागार नुयोग जबुवानी यांना कोणतीही पुर्वकल्पना अथवा नोटीस न देता त्याना काळ्या यादीत टाकण्याचा घाट घातला आहे. तसेच तो प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. पुर्वीच्या सल्लागाराने सर्व डिझाईन तयार केले आहे. कामही त्याचे चांगले आहे. परंतू, आपल्या नातेवाईकाची वर्णी लागावी म्हणून सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा उद्योग हे अधिकारी महाशय करु लागले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button